आदिवासी महिलांच्या सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणात बचत गटांची भूमिका – Research Front

आदिवासी महिलांच्या सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणात बचत गटांची भूमिका

Publication Date : 10-03-2026

DOI: 10.5281/zenodo.19394320


Author(s) :

निलेश सर्जेराव साळवे, डॉ. किशोर गिरीश नवले.


Volume/Issue :
Volume 14
,
Issue 1
(03 - 2026)



Abstract :

सदर संशोधनामध्ये आदिवासी महिलांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणामध्ये बचत गटांची भूमिका अभ्यासण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पालघर व ठाणे जिल्ह्यातील आदिवासी महिला बचत गटांच्या सदस्यांच्या अनुभवांच्या आधारे या गटांच्या कार्याचा महिलांच्या जीवनावर होणारा परिणाम समजून घेण्यात आला. संशोधनासाठी वर्णनात्मक व विश्लेषणात्मक पद्धतीचा अवलंब करण्यात आला असून ३६८ महिला सदस्यांकडून प्रश्नावलीच्या माध्यमातून प्राथमिक माहिती संकलित करण्यात आली. तसेच विविध पुस्तके, संशोधन लेख आणि सरकारी अहवालांच्या आधारे दुय्यम माहितीचा उपयोग करण्यात आला. अभ्यासातून असे दिसून आले की बचत गटांमध्ये सहभाग घेतल्यामुळे बहुसंख्य महिलांच्या वैयक्तिक उत्पन्नात वाढ झाली असून त्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. तसेच घरगुती सुविधांमध्ये वाढ होऊन कुटुंबाच्या राहणीमानात सकारात्मक बदल झाले आहेत. अनेक महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून किरकोळ व्यापार, शेतीपूरक व्यवसाय व लघुउद्योग सुरू करून आर्थिक स्वावलंबन प्राप्त केले आहे. याशिवाय महिलांमध्ये आत्मविश्वास, आर्थिक साक्षरता, सामाजिक प्रतिष्ठा आणि निर्णय क्षमता वाढल्याचेही आढळून आले. या सर्व निष्कर्षांवरून असे स्पष्ट होते की आदिवासी महिला बचत गट हे महिलांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रभावी साधन ठरत आहेत. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी बचत गटांना प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक आहे.


No. of Downloads :

15