माहिती व संप्रेषण या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ग्रंथालयासमोर असणाऱ्‍या समस्या : एक अभ्यास – Research Front

माहिती व संप्रेषण या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ग्रंथालयासमोर असणाऱ्‍या समस्या : एक अभ्यास

Publication Date : 10-03-2026

DOI: 10.5281/zenodo.19455881


Author(s) :

प्रा. पुरुषोत्तम चंद्रकांत सरगर.


Volume/Issue :
Volume 14
,
Issue 1
(03 - 2026)



Abstract :

आधुनिक ग्रंथालय व्यवस्थेमध्ये माहिती व संप्रेषण प्रणालीचा वापर करताना अनेक आव्हांनाचा या शोधनिबंधात सखोल अभ्यास करण्यात आला आहे. समाजव्यवस्थेचा अविभाज्य् भाग असलेल्या माहिती तंत्रज्ञानाची संशोधन आणि ज्ञानप्रसार प्रक्रियेत त्याची महत्वाची भूमिका आहे. संशोधनातून असे निदर्शनास आले की क्षेत्रीय अभ्यास प्रणालीचा वापर करुन ग्रंथालयासमोर आधुनिक पायाभूत सुविधांची कमतरता, मर्यादित निधीची तूरतूद आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता ही प्रमुख आव्हानेआहेत. ई-संसाधने व ऑनलाईन डेटाबेस उपलब्ध्‍ असूनही, मर्यादित तांत्रिक साक्षरतेमुळे संसाधनांचा अपेक्षित प्रमाणात उपयोग होत नाही. कॉपीराइट व डेटा बॅकअप यांसारख्या तांत्रिक समस्यांनाही ग्रंथालयांना सामोर जावे लागते. संशोधनातून असे स्पष्ट् होते की तंत्रज्ञानाचा पूरेपुर वापर करण्यासाठी केवळ संसाधनाची आवश्यकता पुरेशी नसून त्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम, आर्थिक धोरणे, सक्षम सुरक्षांची अंमलबजावणी करणे आवश्य्क आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार ग्रंथालयांनी अद्यावत राहिल्यास शिक्षणाची गुणवत्ता व वाचक समाधान वाढण्यास मदत होईल.


No. of Downloads :

7