भारतीय ज्ञान प्रणाली मधील लोकसाहित्यातील मानवी मूल्यांचे स्थान – Research Front

भारतीय ज्ञान प्रणाली मधील लोकसाहित्यातील मानवी मूल्यांचे स्थान

Publication Date : 10-03-2026

DOI: 10.5281/zenodo.19051836


Author(s) :

श्री. सुरज आत्माराम पवार, डॉ. दीपक गायकवाड.


Volume/Issue :
Volume 14
,
Issue 1
(03 - 2026)



Abstract :

लोकसाहित्य ही भारतीय ज्ञानप्रणालीमधील महत्त्वाची शाखा आहे.लोकसाहित्यातून फार मोठया प्रमाणावर मूल्यसंवर्धन साधले जाते.लोकसाहित्यातील कीर्तन ,पोवाडा या लोकसाहित्यातील वाड्मयाप्रकारातून राष्ट्रभकीचा विकास होण्यास मदत होते.लोकसाहित्याच्या म्हणी कोडी, सुवचने,सण वार, उत्सव,आहिंसा भूतदया मानवता या आधारभूत मूल्यांच्या आधारे सौजन्यशीलता साधता येते. ल़ोकसाहित्य हे कृषीजीवनाशी निगडीत असल्याने त्यांच्या माध्यमातून श्रमप्रतिष्ठा हे मूल्य जोपासले जाते. लोकसाहित्य हे वृक्षपूजा व प्राणीपूजा यांच्या संवेदनशीलता जोपासते. मानवी जीवनाचे महत्त्व आणि विविध आध्यात्मिक बाबी यांच्या माध्यमातून वक्तशीरपणा मूल्य जोपासता येतो.लोकसाहित्याच्या माध्यमातून विविध घटना मागील वैज्ञानिक व लोकतात्विक दृष्टिकोन अभ्यासता येतो. लोक साहित्यामध्ये स्त्री पुरुष समानता साधण्यासाठी उपयुक्त अशी मूलतत्त्वे आढळतात.लोकसाहित्य हे म्हणी, वाक्प्रचार,कोडी यांच्या माध्यमातून संभाषणातील नीटनेटकेपणाचे बाळकडू मानवाला मिळते. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या अनुषंगाने विविध सवयी व विचारसंपदा या लोकसाहित्याच्या माध्यमातून अभिव्यक्त झालेली दिसून येते.


No. of Downloads :

6