विकसित भारत आणि महिला शेतकऱ्यांची भूमिका – Research Front

विकसित भारत आणि महिला शेतकऱ्यांची भूमिका

Publication Date : 10-03-2026

DOI: 10.5281/zenodo.19394815


Author(s) :

नामदेव विठ्ठलराव बच्चेवार, डॉ. शिवराज रामराव पाटील.


Volume/Issue :
Volume 14
,
Issue 1
(03 - 2026)



Abstract :

भारत हा कृषिप्रधान देश असून देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि अन्नसुरक्षा व्यवस्थेचा कणा म्हणजे शेती होय. विकसित भारताच्या निर्मितीसाठी कृषी क्षेत्राचा विकास अत्यंत आवश्यक आहे. या कृषी व्यवस्थेमध्ये महिला शेतकऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असूनही त्यांची भूमिका दीर्घकाळ दुर्लक्षित राहिली आहे. ग्रामीण भागात महिला शेतीतील जवळपास सर्व कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतात बी पेरणी, रोप लावणी, तण काढणे, कापणी, पशुपालन, दुग्धव्यवसाय, बियाणे संवर्धन इत्यादी. या संशोधनात विकसित भारताच्या संकल्पनेत महिला शेतकऱ्यांचे योगदान, त्यांची सद्यस्थिती, समस्या, आव्हाने आणि विकासातील संभाव्य भूमिका यांचा अभ्यास करण्यात आलेला आहे. महिला सशक्तीकरणाशिवाय कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास शक्य नाही, हा या अभ्यासाचा मुख्य निष्कर्ष आहे.


No. of Downloads :

2