भारतातील डिजिटल पेमेंटचा वापर आणि त्यामध्ये निर्माण होणारे धोके
Publication Date : 10-03-2026
Author(s) :
Volume/Issue :
Abstract :
अलीकडील काळात बँक व्यवसायाचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर बदलत आहे. आधुनिक युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. अशा माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बँक व्यवसायातही मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. ग्राहकांना त्वरित आणि चांगल्या बँक विषयक सेवा देण्यासाठी बँकिंग क्षेत्रात संगणकाचा वापर केला जात आहे. त्यातच देशातील लोकांना बँक व्यवसायाची सवय मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्यामुळे बँकेमार्फत व्यवहार करणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत आहे. आधुनिक काळातील स्पर्धात्मक युगात बँकांना टिकून राहण्यासाठी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. आधुनिक काळात बँक व्यवसाय हा केवळ एखाद्या विशिष्ट भागापुरता किंवा देशापुरता मर्यादित न राहता तो जागतिक स्वरूपाचा झालेला आहे. त्यामुळे असा बँक व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर फार वाढला आहे. या तंत्रज्ञानामुळे ग्राहक ते बँक आणि बँक ते बँक अशा प्रकारच्या सुरक्षित बँकिंग सुविधा पुरविल्या जात आहेत. बँकांनी त्यांच्या आधुनिकीकरणात जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर सुरू केला आहे. त्यातूनच खऱ्या अर्थाने डिजिटल बँकिंग प्रणालीचा उदय झाल्याचे मानले जाते.
No. of Downloads :
1

