लोकसाहित्य, संस्कृती जतन आणि युवा पिढी सक्षमीकरण – Research Front

लोकसाहित्य, संस्कृती जतन आणि युवा पिढी सक्षमीकरण

Publication Date : 10-03-2026

DOI: 10.5281/zenodo.19689502


Author(s) :

प्रा. वर्षा पाटोळे.


Volume/Issue :
Volume 14
,
Issue 1
(03 - 2026)



Abstract :

लोकसाहित्य हे एक अमूल्य सांस्कृतिक संपदा आहे. जी आपल्या समाजाचा इतिहास, संस्कृती आणि मूल्याची गाथा सांगते. लोकसाहित्यामध्ये गाणी, कविता, कथा, लोकोक्ती आणि अन्य मौखिक परंपरांचा समावेश होतो. लोकसहित्याचे जतन आणि प्रचार करणे हे आपल्या सांस्कृतिक विरासतीचे रक्षण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. लोकसंस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे लोकसाहित्य होय. पण तरी देखील या लोकसाहित्याचे स्वरूप संमिश्र आणि गुंतागुंतीचे असल्याने त्यात सर्वच समाविष्ट होतील अशी सर्वसामन्य व्याख्या अद्याप झालेली दिसत नाही. लोकसाहित्याचे अभ्यासक, विद्वान आपल्या अभ्यासातून वेगवेगळ्या व्याख्या मांडताना दिसतात. पण तरीही लोकसाहित्य हे लोकांनीच निर्माण केलेले असते हे महत्त्वाचे आहे.


No. of Downloads :

1